पिंक ई-रिक्षा योजना महाराष्ट्र GR 2024 - 17 शहरात 10,000 महिलांना गुलाबी रिक्षा, पात्रता आणि अटी
महाराष्ट्रात अनेक महिलांना नोकरी नसल्यामुळे घर चालवणे कठीण होते. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत एक भन्नाट योजना आणली आहे - पिंक ई-रिक्षा योजना. या योजनेत महिलांना स्वतःची गुलाबी ई-रिक्षा घेऊन रोज 1000-1500 रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आता 2026 च्या नवीन नियमानुसार सरकार 40% अनुदान देत आहे. चला तर मग, या योजनेचा GR काय सांगतो, कोणाला फायदा मिळेल, ते सविस्तर पाहूया. पिंक ई-रिक्षा योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाने राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णय दिनांक 8 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी जाहीर केली होती. 17 शहरांतील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या प्रस्तावावर शासनाने ही योजना मंजूर केली. २. योजनेतील लाभार्थ्यांची संख्या - 10,000 शासन निर्णयानुसार राज्यात...